बातम्या
आता थेट जनताच ठरवेल शिवसेना नेमकी कुणाची..? - उद्धव ठाकरे
By nisha patil - 1/17/2024 3:08:01 PM
Share This News:
आता थेट जनताच ठरवेल शिवसेना नेमकी कुणाची..? - उद्धव ठाकरे
मुंबई : लवादाने जो निकाल दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. शेवटची आशा म्हणून थेट जनतेच्या न्यायालयात आलो आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाने माझ्यासोबत येऊन जनतेत उभे राहावे. तिथे त्यांनी सांगावे की शिवसेना कोणाची मग जनताच ठरवेल असे सांगत शिवसेनेचे ठाकरे गट प्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांना पुढे करून राजकारण करणाऱ्या लोकशाहीद्रोही आहेत. आशिष सनसनीत टीका मंगळवारी महा पत्रकार परिषदेत केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची ही वाट पाहत नाहीत. विधानसभा निवडणुका घ्या, असे आव्हान ही ठाकरे यांनी यावेळी दिले. विधानसभा अध्यक्ष राहू नर्वेकर यांनी दिलेल्या अपात्रते संदर्भातील निकालानंतर हा निकाल कसा लोकशाही विरोधी आहे हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी दोन येथे पत्रकार परिषद घेतली. यावी ठाकरे गटाचे नेते आणि वकील व्यासपीठावर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला सभेसाठी गर्दी झाली होती. सुरुवातीला वकिलांनी कायदेशीर बाजू मांडल्या आणि नंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
आता थेट जनताच ठरवेल शिवसेना नेमकी कुणाची..? - उद्धव ठाकरे
|