बातम्या

आता आदर्श गुरुकुलमधील विद्यार्थ्यांची नोंद होणार युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये..

Now the students of Adarsh ​​Gurukul will be registered in Universal World Record


By nisha patil - 1/20/2025 3:32:57 PM
Share This News:



आता आदर्श गुरुकुलमधील विद्यार्थ्यांची नोंद होणार युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये..

1111 विद्यार्थ्यांच्या महावाचनाने होणार उच्चांकी नोंद

संविधान महावाचन सप्ताहास प्रारंभ

पेटवडगाव - तारा न्यूजसाठी विक्रम केंजळेकर, कोल्हापूर पेटवडगाव येथील आदर्श गुरुकुल संकुलात संविधान महावाचन सप्ताहास आजपासून सुरुवात झाली. यावेळी १,१११ विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमल महाडिक व दलितमित्र आमदार अशोकराव माने उपस्थित होते.

आमदारांनी संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, "भारतीय संविधान केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे. समतेची व समानतेची मूल्ये रुजवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केले."

हा सप्ताह सात दिवस चालणार असून, दररोज चार तास विद्यार्थी संविधानाचे वाचन करतील. या उपक्रमाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाला आदर्श गुरुकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिव सौ. एम. डी. घुगरे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 


आता आदर्श गुरुकुलमधील विद्यार्थ्यांची नोंद होणार युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये..
Total Views: 315