बातम्या
आता कुस्तीपटूंविरोधात कुस्तीपटूंचेच आंदोलन
By nisha patil - 4/1/2024 7:40:45 PM
Share This News:
गेले वर्षभर देशातील तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेविरोधात चालविलेल्या आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या विरोधात बुधवारी अनेक नवे कुस्तीपटू उभे राहिले आहेत. या ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या हट्टाग्रहापोटी कुस्ती खेळाची हानी झाली असून कनिष्ठ कुस्तीपटूंचे मोलाचे एक वर्ष वाया गेले. त्यामुळे त्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम झाला, असा त्यांचा आरोप आहे. कुस्ती क्षेत्रातील कार्ये आता पुन्हा हाती घेतली जावीत, अशी त्यांची मागणी आह
आंदोलन बुधवारी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या तीन राज्यांमधील विविध नवीन कुस्तीपटूंनी केले. या आंदोलनात 200 हून अधिक नवे कुस्तीपटू सहभागी झाले होते. ते अनेक बसेसमधून दिल्लीतील जंतर मंतर येथे एकत्र जमले आणि त्यांनी या तिघांविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य लोकांचाही मोठे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले
वर्षभरापासून कुस्ती संघटना आणि संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या विरोधात या नव्या कुस्तीपटूंनी जोरदार घोषणा दिल्या. ‘या तिघांपासून आमची कुस्ती वाचवा’ अशी घोषणा असणारे फलक या नवकुस्तीपटूंनी हातात धरले होते. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तथापि, या कुस्तीपटूंनी त्यांचा राग व्यक्त केला.
आता कुस्तीपटूंविरोधात कुस्तीपटूंचेच आंदोलन
|