बातम्या
आता हायवेवर चक्का जाम
By nisha patil - 11/22/2023 4:51:07 PM
Share This News:
मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात उसाला 3500 रुपये मिळावेत यासाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे या बाबत सहकारमंत्री याच्यासोबत तोडगा काढण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली
स्वाभिमानी संघटनेच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात उसाला 3500 रुपये मिळावेत यासाठी आंदोलन सुरु आहे याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही सदर विषयाबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली.होती या बैठकीत कोणीही माघार घ्यायला तयार नाहीत . यावर तोडगा काढण्यासाठी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.
स्वाभिमानी संघटनेने बैठक निष्फळ झालेमुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून आता हायवेवर चक्काजाम करणार आहेत
या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनमुश्रीफ ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ,साखर आयुक्त अधिकारी उपस्थित होते
आता हायवेवर चक्का जाम
|