बातम्या
आता शासकीय रुग्णालयात ही कॅशलेस सेवा लवकरच सुरू होणार
By nisha patil - 4/1/2024 7:35:04 PM
Share This News:
सातारा : राज्य शासनाने शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व दिले आहे सार्वजनिक आरोग्य विभागात लोकहिताचे निर्णय घेतले राज्य शासनाने 2035 चे व्हीजन तयार केले आहे. त्यामध्ये आरोग्य विषयक धोरण आखले आहे. बैरी के महाविद्यालयांना जोडलेली जिल्हा रुग्णालय परत मिळवण्यात अनेक वर्ष जातात म्हणून पर्यायी यंत्रणा उभे राहावी यासाठी निर्णय घेतले आहेत. शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा व अन्न उपक्रमांचा शुभारंभ ई- शुभारंभ, ई -भूमिपूजन लोकार्पण शिरवळ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले राज्यातील दोन कोटी लोकांना शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य आपल्या दारी ही देखील आपली संकल्पना आहे खाजगी रुग्णालयात मिळणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा भविष्यात शासकीय रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यभरात स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहे. त्याचा अधिक विस्तार करून नव्याने असे 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात मॉडेल स्कूल तयार करून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन आधुनिक पिढी घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे असे ते म्हणाले.
आता शासकीय रुग्णालयात ही कॅशलेस सेवा लवकरच सुरू होणार
|