विशेष बातम्या

आता मैदान कोण मारणार? टीम इंडिया की, टीम ऑस्ट्रेलिया

Now who will beat the field Team India Key Team Australia


By Administrator -
Share This News:



 क्रिकेटचा प्राण म्हणजे, कसोटी क्रिकेट अन् कसोटी क्रिकेटचा विश्वचषक  म्हणजेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप . या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसोबत भिडणार आहे. अशातच दोन्ही संघांचीही घोषणा झाली आहे. दोन्ही देशांनी WTCसाठी संघ जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशि फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघाची  घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय संघाची कमान रोहित शर्मा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियानंही आपल्या संघाची घोषणा केली असून कांगारूंनी संघाची कमान पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे.  
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Now who will beat the field? Team India Key, Team Australia