बातम्या

आता महिला सैनिकांनाही मिळणार मातृत्व रजा...

Now women soldiers will also get maternity leave


By nisha patil - 6/11/2023 9:11:37 PM
Share This News:



आता सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही प्रसूती, बाळ संगोपन आणि दत्तक घेण्यासाठी रजा आणि इतर सुविधांसारखे समान लाभ मिळणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महिला सैनिक, महिला नौसेनिक, आणि महिला एअरमेन यांना मातृत्व, बाल संगोपन अनिमल दत्त घेण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांच्या अधिकारांप्रमाणे रजा आणि इतर सुविधा मिळतील अग्नीवीर महिलानाही ही सुविधा मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हणले आहे.
    केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी महिला सैनिकांना मोठी भेट दिली आहे. आता महिला सैनिकांना त्यांच्या पदाचा विचार न करता समान प्रसूती रजा मिळणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व महिला लष्करी कर्मचाऱ्यांना समान मात्र आणि दत्तक रजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे सशस्त्र दलांमध्ये सर्व श्रेणीतील महिलांचा सर्व समावेशक सहभाग सुनिश्चित होईलअसे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आता किती दिवसाची रजा मिळणार?

  मिळालेल्या माहिती नुसार सध्या महिला अधिकाऱ्यांना प्रत्येक मुलामागे 180 दिवसांची प्रसूदी रजा मिळते हा नियम जास्तीत जास्त दोन मुलांना लागू होतो संपूर्ण सेवा कालावधीत महिला अधिकाऱ्यांना 360 दिवसांचा बालसंगोतून रजा मिळते तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला दत्तक घेण्याच्या वैद्य तारकेनंतर 180 दिवसांची दत्तक रजा दिली जाते.


आता महिला सैनिकांनाही मिळणार मातृत्व रजा...