बातम्या

OMG 2 मधील 'हर हर महादेव' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

OMG 2 came to the audience


By nisha patil - 7/27/2023 6:15:27 PM
Share This News:



 अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या ओह माय गॉड २ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.ओह माय गॉड 2  हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. तसेच या चित्रपटामधील 'ऊंची ऊंची वादी' हे गाणं देखीर रिलीज झालं. आता या चित्रपटामधील हर हर महादेव  हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा होत आहे.ओह माय गॉड 2 या  चित्रपटामधील  हर हर महादेव  या गाण्याला विक्रम माँट्रोजने संगीत दिले आहे. हे गाणे विक्रमनेच गायले आहे. शेखर अस्तित्व यांनी हे गाणं लिहिले आहे. अक्षय कुमारनं सोशल मीडियावर हे गाणं शेअर केलं आहे. अक्षयनं शेअर केलेल्या या गाण्याला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन या गाण्याचं कौतुक केलं आहे.ओएमजी- 2 हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.' या चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. तर सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनेही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला असून चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटातील 20 कट्स सुचवले आहेत. इतकंच नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हाईजिंग कमिटीनं चित्रपटाला 'ए' म्हणजेच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्याबाबत बोललं आहे. ओएमजी-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी यांनी ओएमजी-2 या चित्रपटात कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारली आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर  रिलीज झाला होता. या टीझरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.


OMG 2 मधील 'हर हर महादेव' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस