बातम्या

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे आवाहन

Officers and employees of essential services


By nisha patil - 5/16/2024 12:10:09 PM
Share This News:



लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे पासून टपाली मतदान सुरू झाले आहे. दोन दिवसात ७७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी दिली .

गुरुवार १६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दातकर यांनी केले आहे.

विक्रोळी पूर्व येथील पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  मतदान करावे. त्यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले .


अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे आवाहन