बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारणी जाहीर.

Officials of Digital Media Parishad announced in Kolhapur district


By nisha patil - 2/11/2024 11:45:45 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारणी जाहीर.

पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर. राज्यातील सर्वाधिक पत्रकारांचा गोतावळा असलेल्या देशातील सर्वात जुनी आणि मोठ्या अशा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये कार्यकारिणी सदस्य पदासाठी सात जनांचा समावेश करण्यात आला आहे.

.सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारिता क्षेत्रही  डिजिटल झाले आहे. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाला अनुसरून महाराष्ट्रातील आद्य पत्रकार संघटना व पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखले जाणा-या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने संघटनेशी संलग्न संपूर्ण महाराष्ट्र व देशातील मराठी बहुल डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची 'डिजिटल मीडिया राज्य संघटना' सप्टेंबर 2024 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. 


     

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, तसेच विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे आणि डिजिटल मिडिया महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि कार्याध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

             

 जिल्हा कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे आहेत.

गणपती लक्ष्मण शिंदे (हातकणंगले), नथुराम शंकर डवरी (शाहुवाडी), संभाजी बाजीराव सुतार (गगनबावडा), शहाबाज शब्बीर मुजावर (तारा न्यूज व ab9 प्रतिनिधी पन्हाळा),

तर विक्रम भिवा पाटील (बी न्यूज व लोकमत प्रतिनिधी पन्हाळा), राजू कांबळे (शिरोळ) अभिजीत पटवा (इचलकरंजी) अशी निवड झालेल्या पत्रकारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा अध्यक्ष सचिन वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य कार्यरत आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारणी जाहीर.