बातम्या

अहो आश्चर्य चक्क कोल्हापुरातच हरवले खासदार

Oh surprise MP lost in Kolhapur itself


By nisha patil - 2/11/2023 6:31:52 PM
Share This News:



राज्य शासनाकडून मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबामुळे  मराठा समाजामध्ये  संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते . अजूनही अनेक आमदारांनी खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याने मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अशातच मराठा समाज पंचक्रोशी पेटवडगाव  यांनी हातकणंगले मतदार संघातून खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोख आंदोलन केले आहे 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कित्येक दिवस मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे तरीही शासनाने याबाबत अजून ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे अजूनही कित्येक आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याने मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सकल मराठा समाज पंचक्रोशी पेटवडगाव यांनी  हातकणंगले मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केले त्यांनी खासदार हरवला आहे असा फलक उभारून त्या फलकावर वर्णगोरा ,दाढी वाढलेली  असं लिहिलं असून त्याचबरोबर मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली आहे कुठे आढळल्यास मतदारसंघात पाठवणे करावी लवकरात लवकर परत ये कोणीही रागवणार नाही तुझी खुप आठवण येते असा मजकूर सकल मराठा समाज पंचक्रोशी पेटवडगाव यांनी  लिहून खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनोखा आंदोलन केले आहे


अहो आश्चर्य चक्क कोल्हापुरातच हरवले खासदार