बातम्या

ॐ श्री स्वामी समर्थ जगदंब ॐ * स्वामी प्रकट दिन सोहळा *

Om Sri Swami Samarth Jagdamba Om


By nisha patil - 2/4/2024 6:37:27 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी सांगली फाटा , शिरोली, कोल्हापूर येथे सर्व भक्तांच्या कल्याणासाठी  मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी  साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या  गुडीपाडव्याचा सण आणि  बुधवार दिनांक १० एप्रिल  २०२४ रोजी अनंतकोटी  ब्रम्हांडनायक  भक्तवत्सल सचिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अत्यंत उत्साहात साजरा  केला जाणार  आहे. अवलिया परमपूज्य सदगुरू श्री गणावधूत महाराज ह्या सोहळ्याप्रसंगी सर्व भक्तांना आशिर्वाद देतील .  सोहळ्यात  साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे : मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४: गुडीपाडव्याच्या अतिशय शुभ दिवशी  संध्याकाळी ५ ते ६:३० दरम्यान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी सामुदायिक नामस्मरण . 
*बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ :
*सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थाना महास्नान / अभिषेक
* प्रकटकांड वाचन 
*सकाळी १० वाजता स्वामी जगदंब याग . 
*सकाळी ११:३० वाजता प्रसाद वाटप .  
*सायंकाळी ६:३० वाजता महाआरती . त्यानंतर परमपूज्य सदगुरू श्री काटकर साहेब प्रासादित स्वामींची तसबीर आणि पादुकांची श्री स्वामी जगदंब कार्यसिध्दी मंदिरास पालखी प्रदक्षिणा . 
सर्व स्वामी समर्थ जगदंब भक्तांनी सुंदर अश्या ह्या सोहळ्यास नमूद केलेल्या वेळेआधी  हजर राहून श्री स्वामी समर्थ आई जगदंबेच्या  कृपार्शिर्वादाचा लाभ घ्यावा. 
आपले  विनीत , 
मिलिंद धोंड (दादा )
( स्वामी आई जगदंब  भक्त)


ॐ श्री स्वामी समर्थ जगदंब ॐ * स्वामी प्रकट दिन सोहळा *