बातम्या

‘मिशन रोजगार’ अंतर्गत 27 जुलै रोजी महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळा

On 27th July underMission Rozgar Imitation Jewelery Workshop for Women


By nisha patil - 7/23/2024 9:53:00 PM
Share This News:



कोल्हापूर:  आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'मिशन रोजगार' उपक्रमांतर्गत इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळोखे नगर कॅम्पस येथील कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर येथे 27 जुलै रोजी ही एक दिवसीय कार्यशाळा होणार आहे. 

सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग व जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर स्किल कौन्सिल यांच्या रॅम्प या योजने अंतर्गत महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी या कार्यशाळेत  कोल्हापुरी साज, फ्लावर ज्वेलरी, बुगडी, नथ, क्रिस्टल ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी बनवण्याचे प्रत्यक्ष कौशल्य शिकवले जाणार आहे. यासोबतच शासकीय प्रमाणपत्र आणि मोफत उद्योग आधारची नोंदणीही करून दिली जाणार आहे.a

या कार्यशाळेसाठी इच्छुक महिलांनी कोल्हापूर दक्षिण शहर काँग्रेस कमिटी, विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास सेलच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रियंका मोहिते मोबाईल क्रमांक 8208339085 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर इनक्युबेशन सेंटरचे श्री राजन डांगरे यांनी केले आहे.


‘मिशन रोजगार’ अंतर्गत 27 जुलै रोजी महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरी कार्यशाळा