बातम्या
9 जून 2024 रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती समारंभ
By nisha patil - 4/6/2024 11:59:28 AM
Share This News:
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार ” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक, संवर्धक, ज्ञानतपस्वी, ध्येयवादी समाजशिक्षक आणि द्रष्टे समाजचिंतक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे संपन्न होत आहे.
या समारंभामध्ये अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे जनक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे चे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय वारे (गुरुजी) यांचे “ नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व संस्थेच्या 13 जिल्हयातील 407 शाखांमधून बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करणेत आले आहे.
या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे.
9 जून 2024 रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती समारंभ
|