बातम्या

31 डिसेंबर रोजी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली

On December 31 the municipal parks were open till 12 midnight


By nisha patil - 12/30/2024 10:06:47 PM
Share This News:



मंगळवार, दि.31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेणेसाठी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.

यामध्ये रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे उद्यान, शेळके उद्यान, पद्मावती उद्यान, नेहरु बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, महावीर उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क उद्यान, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक उद्यान, रुईकर ओपन उद्यान, सम्राटनगर उद्यान, टेंबलाई उद्यान, श्रीराम उद्यान, इत्यादी उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यन्त खुली ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्यान विभागाच्यावतीने करण्यात आलय.


31 डिसेंबर रोजी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली