बातम्या

पंकजा मुंडेंच्या 'त्या' व्हिडीओ वर चंद्रकांत पाटील म्हणाले...

On Pankaja Munde s That videon Chandrakant Patil said


By nisha patil - 11/24/2023 5:14:04 PM
Share This News:



  पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता त्यात त्यांनी आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडेंनी गाणं गात सांगितलं होतं. आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आमच्या पप्पांनी गणपती आणला, या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला, असं त्यांनी  म्हटलं होतं. आता त्यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चांना ऊत आला. आहे त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी प्रतिक्रिया दिली. 
      "पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते. कधी गंभीर झाल्या की बातमी होते. त्यामुळे त्यांचं दुर्दैव की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


पंकजा मुंडेंच्या 'त्या' व्हिडीओ वर चंद्रकांत पाटील म्हणाले...