बातम्या
राहुल गांधींच्या 53वा वाढदिवस जाणून घेऊया त्यांची राजकीय कारकीर्द
By nisha patil - 6/19/2023 5:17:07 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस. त्यांचा 19 जून 1970 रोजी जन्म झाला आहे. गेल्या काही महिन्यापांसून ते आपल्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.आज राहुल गांधी 53 वर्षाचे झाले आहेत. त्यांना बालपणापासून सुरक्षेच्या कारणामुळे अनेक वेळा शाळा बदलावी लागली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे राहुल यांचे पंजोबा आहेत. तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते नातू आहेत.राहुल यांचे शालेय शिक्षण सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या घरीच देण्यात आले. त्यांचे बालपण आणि तारूण्य सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच जास्त गेले. राजीव गांधीच्या हत्येनंतर त्यांच्याही जीवास धोका होता. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये अॅडमिश घ्यावं लागलं. यानंतर 1994 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी केंब्रिजमध्ये प्रवेश घेतला आणि एम. फिल.पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.2004 मध्ये राहुल पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी अमेठीच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला.यानंतर त्यांनी 2009 मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकलेही. यावेळी त्यांनी तब्बल 3 लाख 70 हजारा मतांनी मोठा विजय मिळविला होता.2014 साली ते पुन्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपाच्या स्मृती ईराणी अमेठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
मात्र राहुल गांधी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकेल आणि स्मृति ईरानी यांना पराभवाचा सामना करावा लागला.2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल चौथ्यांदा अमेठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पण त्यांना भाजपाच्या स्मृति इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवल्यामुळे मोठ्या मतांनी विजय मिळविला. यावेळी त्यांनी तब्बल 4 लाख मतांनी विजयी मिळविला होता.2007 मध्ये राहुल यांना काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना पक्षाचं महासचिवपद देण्यात आलं. यासोबत त्यांना भारतीय युवक काँग्रेस आणि काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रभारी महासचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.2009 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए घटक पक्ष दुसऱ्यांदा सत्ता मिळविली होती. यावेळी राहुल गांधी यांच्याकडे मानव संसाधन विकास स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. 2013 मध्ये राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर 2018 मध्ये त्यांची काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.यानंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला भाजपाकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं.
या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या राहुल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पूर्वीचं वैभव मिळवून देण्यासाठी झटत आहेत. याच वर्षी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा कन्याकुमारीपासून ते जम्मू कश्मीरपर्यंत 136 दिवसांपर्यंत चालली.
राहुल गांधींच्या 53वा वाढदिवस जाणून घेऊया त्यांची राजकीय कारकीर्द
|