बातम्या

शिक्षक दिनी शहाजी महाविद्यालयात ७१ विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकाची भूमिका

On Teachers Day71 students performed the role of teacher in Shahaji College


By nisha patil - 6/9/2023 4:14:54 PM
Share This News:



 दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज 71 विद्यार्थ्यांनी विविध वर्गात जाऊन शिक्षकाची भूमिका पार पाडली. शिक्षक म्हणून आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी नंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमात विषद केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण यांनी शिक्षक झालेल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. 
     

या कार्यक्रमात प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिक्षक बनलेल्या विद्यार्थिनी  गौरी काशीद, दिशा मानाचे, साक्षी शिंदे, सोनाली कांबळे, निकिता पाटील यासह अन्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक म्हणून एक तास काम करण्यासाठी आठ दिवस आम्ही अभ्यास, वाचन, लेखन केले असा अनुभव त्यांनी सांगितला. 
   

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले , शिक्षक हे सतीच वाण आहे. समाजात परिवर्तन करण्याची ताकद शिक्षकांच्या मध्ये आहे. शिक्षकांनी चौफेर वाचन,लेखन करून आपले अनुभव समृद्ध करावेत. शीलवान, कर्तुत्ववान आणि क्षमाशील  हे गुण शिक्षकांच्या मध्ये असणे गरजेचे आहे. शिक्षकी पेशा हा प्रमोच्य आनंद देणारा असा व्यवसाय आहे. आपणा स्वतःबरोबर विद्यार्थी घडवण्याची संधी या क्षेत्रात आहे.
   

सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. के. एम. देसाई यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. साक्षी शिंदे,सोनाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. गौरी काशीद हिने आभार मानले. डॉ. आर. डी. मांडणीकर,डॉ.दीपक कुमार वळवी, डॉ. ए.बी.बलुगडे, ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. 
   

संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या  कार्यक्रमास प्रोत्साहन मिळाले.  प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड व प्रा.पी.के.पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.


शिक्षक दिनी शहाजी महाविद्यालयात ७१ विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकाची भूमिका