बातम्या

भाजपच्यावतीने कागल शहरात नारीशक्ती वंदन दौड उत्साहात संपन्न

On behalf of BJP Nari Shakti Vandan Run was held in Kagal city with enthusiasm


By nisha patil - 5/3/2024 7:39:26 PM
Share This News:



भाजपच्यावतीने कागल शहरात नारीशक्ती वंदन दौड उत्साहात संपन्न

कागल प्रतिनिधी संपूर्ण देशभरात काढलेल्या 'नारिशक्ती वंदन दौड'अंतर्गत महिला रॕलीचे कागल शहरात आयोजन करण्यात आले होते. कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढली. खर्डेकर चौकातील श्री राम मंदिर येथून निघालेली ही रॅली बस स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व तेथून परत राम मंदिर पर्यंत  काढली.या रॅलीमध्ये महिला शासनाच्या विविध योजनांचे फलक हातात घेऊन सहभागी झाल्या होत्या.
 

महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा  सुधा कदम म्हणाल्या,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीवंदन विधेयकांना महिला शक्तीचा सन्मान केला आहे. त्यांनी महिलांच्या  सबलीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.कागल विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे  व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  नवोदिता घाटगे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गट तट न पाहता राबवून महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.
 तालुकाध्यक्षा स्नेहल पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नारिशक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना न्याय देत, सन्मान केला. महिलांच्या उन्नतीकरणासाठी अनेक योजना आखल्या आणि राबवल्या आणि पूर्ण केल्या आहेत. 

यावेळी  रंजना वासकर, किरण कोराने, यशोदा हजारे, अनिता संकपाळ,संगीता खोत, अश्विनी भोसले आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
    
नारीशक्तीचा विजय असो,  मोदी सरकार चारसौ पार, फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणांनी महिलांनी परिसर दणाणून सोडला.


भाजपच्यावतीने कागल शहरात नारीशक्ती वंदन दौड उत्साहात संपन्न