बातम्या
के.एस.चौगुले आण्णा यांच्या वतीने बा.भोगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न
By nisha patil - 2/28/2024 4:11:01 PM
Share This News:
के.एस.चौगुले आण्णा यांच्या वतीने बा.भोगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न
आपले आरोग्य चांगले हवं असेल तर व्यायामाची गरज डॉ. के.एस.चौगुले
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोतोली समाजाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर समाजाचे आरोग्य चांगले पाहिजे.आयुष्यमान भारत कार्ड सर्वांनी घ्यावे त्यामुळे पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला जातो त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे या विभागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बाजारभोगाव ता.पन्हाळा येथे सर्व रोग निदान मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिर प्रसंगी डॉ.के.एस.चौगुले बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था संचालक सौ.कल्पनाताई चौगुले,बाजारभोगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सीमा हिर्डेकर,संस्था सचिव शिवाजीराव पाटील, संस्था संचालक डॉ.अजय चौगुले,प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.बी.एन रावण ॲक्टिव्हिटी प्रमुख डॉ.एस.एस.कुरलीकर होते.
यावेळी बालरोग तज्ञ डॉ.अमोल थोरात,स्त्रीरोग तज्ञ डॉ.आकांक्षा थोरात,एम.डी.डॉ.अमित पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ.संदीप बोडके, दंतचिकित्सक डॉ.मिहीर सिनकर वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश राजेरिया, डॉ.मोहनलाल कुलकर्णी यांनी लोकांची आरोग्य तपासणी व उपचार केले.
यावेळी एकुण १७८ लोकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. एम.के.कांबळे यांनी केले तर आभार प्रा.मनिषा सावंत यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डी.एच.नाईक यांनी केले.
के.एस.चौगुले आण्णा यांच्या वतीने बा.भोगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न
|