बातम्या
करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वराज्य सप्ताह कार्यक्रम पार
By nisha patil - 2/18/2024 1:05:57 PM
Share This News:
बालिंगा: (प्रतिनिधी)युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने " स्वराज्य सप्ताह कार्यक्रम" बालिंगे हायस्कूल बालिंगे येथे संयोजक मधुकर जांभळे यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शितल फराकटे अध्यक्षा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,व आदिल फरास अध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे होते.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना बाबासाहेब पाटील म्हणाले की, शिवाजी महाराज यांचे नांव घेताच अंगामध्ये उत्साह निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांची अडचण, दुष्काळ पाहुन रयतेचे राज्य निर्माण केले होते त्याचप्रमाणे मुश्रीफ साहेब यांनीही करोना काळात जाती धर्माचा विचार न करता कामकाज केले आहे.
या वेळी आदिल फरास, शितल फराकटे व शिवाजी देसाई , संभाजी पाटील यांची भाषणे झाली.
संयोजक मधुकर जांभळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून स्वराज्य सप्ताह कार्यक्रम निमित्ताने बालिंगे हायस्कूल बालिंगे येथे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हे नमूद केले.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच विविध स्पर्धाचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेत अंतरा दिवसे, देवराज सुतार,आलीशा देसाई यांना तर चित्रकला स्पर्धेत मध्ये आविष्कार कांबळे,साईनाथ साबळे,श्रेयस पाटील तसेच रा़ंगोळी स्पर्धेत साक्षी वरुटे, कादंबरी वाडकर सचीन लोकरे यांनी प्रथम , व्दितीय,व तृतीय क्रमांक पटकावला होता त्यांचा सत्कार अध्यक्ष व पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला. तसेच कात्यायनी सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था मर्यादित बालिंगा यांचे चेअरमन व व्हाईस चेअरमधपदी शशिकांत खांडेकर व अनील जांभळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव खाडे यांनी केले तर आभार सुभाष पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास बालिंगे गावच्या सरपंच पुजा जांभळे,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर,शहराध्यक्ष आदिल फरास ,महिला जिल्हाध्यक्ष शीतल ताई फराकटे , शिवाजी देसाई ,संभाजी पाटील तसेच बालिंगे गावचे प्रतीष्ठीत नागरीक, बालिंगे हायस्कूल बालिंगे चे विद्यार्थी व शिक्षक तसेच माजी सरपंच मयुर जांभळे व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी केले.*
करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वराज्य सप्ताह कार्यक्रम पार
|