बातम्या

कोल्हापूर वर्कर्सच्या वतीने ज्योतिबा दिंडी उत्साहात संपन्न...

On behalf of Kolhapur workers


By nisha patil - 3/25/2024 5:00:43 PM
Share This News:



कोल्हापूर वर्कर्सच्या वतीने ज्योतिबा दिंडी उत्साहात संपन्न...

आरोग्यप्रेमी छत्रपती मालोजीराजे यांच्या उपस्थितीत दिंडीला सुरुवात..

जवळजवळ 400 ते 500 आरोग्य प्रेमींचा दिंडीमध्ये सहभाग... 

 दरवर्षी प्रमाणे जोतिबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात कोल्हापूर वर्कर्स आयोजित आंबाबाई मंदिर ते जोतिबा पायी दिंडी उत्साहात पार पडली.दि. 24 मार्च रोजी सकाळी भल्या पहाटे ठीक चार वाजे पासूनच कोल्हापुरातील तमाम आरोग्य प्रेमिंची महाद्वार येथील आंबाबाई मंदिर प्रवेशद्वार समोर मोठ्या संख्येने वरदळ सुरू झाली.

ठीक 4:45 वाजता आंबाबाई मंदिराचे प्रवेशद्वार उघडताच आरोग्यप्रेमी छत्रपती मालोजी राजे यांचे हस्थे तसेच इतर मान्यवर  सुशील कोरडे, दिलीप देसाई, रांनींगा तसेच पत्रावळेआन्ना यांचे उपस्थित पायी दिंडीचे झाले.देवीची प्रार्थना नांदवडेकर तर आरोग्याचे गाऱ्हाणे  नांदवडेकर यांनी घातल्या नंतर छत्रपती मालोजी राजे यांनी सर्व आरोग्य प्रेमी यांना शुभेच्छा दिल्या आणि दिंडीला सुरवात झाली.जवळ जवळ चारशे ते पाचशे आरोग्य प्रेमींनी आगदी उत्साहात आपला सहभाग नोंदवला.मुख्यतः कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी अमोल येडगे  यांनी कोल्हापूर वॉकर्स कोल्हापूर यांचे विनंतीला मान देऊन स्वतः उस्पूर्त पणे पायी दिंडीत सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली.त्यांनी  सर्व आरोग्य प्रेमींना शुभेच्छा दिल्या व सर्व संयोजकांचे तोंड भरून कौतुक केले.


कोल्हापूर वर्कर्सच्या वतीने ज्योतिबा दिंडी उत्साहात संपन्न...