बातम्या

मनसेच्या वतीने विभागीय सहनिबंधक च्या समोर आमरण उपोषण

On behalf of MNS hunger strike in front of the divisional joint registrar


By nisha patil - 12/1/2024 8:03:30 PM
Share This News:



कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्यातील  शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. यामुळे आज मनसेच्या विभागिय सहनिबंधक आँफीसमोर
आमरण उपोषण सुरु करण्यात आले 
   
2019 ची ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना  हि थकित कर्जदारासाठी राबविली होती पण  थकित कर्जदाराबरोबर प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांनी कर्ज भरून चूक केली असे वाटू नये म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50000अनुदान जाहीर केले होत पण चुकीचे निकष लावून प्रामाणिक शेतकऱ्यांना  अपात्र ठरवल आहे.  
   

नियमित व मुदतीत पिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास संस्थान मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते. 
 

17 ते 2020 या तीन वर्षात किमान दोन वर्ष पीक कर्ज घेऊन ते मदतीस काढले असेल त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार होता पण शासनाकडे या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ज्या सहकार विभागाच्या सॉफ्टवेअर मध्ये भरली होती, त्यावेळी अनेक पात्र व प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यातून अपात्र ठरवण्यात आले आणि हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय आहे. नियमित कर्जफेड करणारे आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना अपात्र करून अन्याय केला जात.  शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहन पर अनुदान  आठ दिवसांत देण्यात यावे अन्यथा मनसेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशारा देण्यात आलाय
   आमरण उपोषण ला राजु दिंडोर्ले, प्रसाद पाटील, अमित पाटील, निलेश धुम्मा, अमित पाटील, अमर बचाटे,अभिजित पाटील, नवनाथ निकम,अमर कंदले,शरद जाधव,विक्रम नरके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


मनसेच्या वतीने विभागीय सहनिबंधक च्या समोर आमरण उपोषण