बातम्या
संयुक्त ताराबाई पार्क कोल्हापूर यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन....
By nisha patil - 2/19/2024 3:44:19 PM
Share This News:
कोल्हापूर : संयुक्त ताराबाई पार्क कोल्हापूर, यांच्यावतीने सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर व नागरिकांच्या मनोरंजनासाठी सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच आज सकाळी १०.२० ला जन्मसोहळा साजरा करण्यात आला.
संयुक्त ताराबाई पार्क शिवजयंती सोहळ्यानिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून 18 तारखेला सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान रक्तदान शिबिराचे तर रात्री 9:30 ते 11 या दरम्यान सोंगी भजनाचे आयोजन करण्यात आले. तर 19 तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मोत्सव सोहळा भागातील महिलांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विविध पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री आठ वाजता मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. यशवंत थोरात व मा. आशिष शहा प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार असून.. नागरिकांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त ताराबाई पार्क चे आयोजक शुभम सावर्डेकर, अक्षय कुमार कदम, सिद्धेश खानोलकर, सौरभ भुतडा, राहुल गव्हाणे, सैफ शेख यांच्यावतीने करण्यात आले आहे
संयुक्त ताराबाई पार्क कोल्हापूर यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन....
|