बातम्या
बी आर एस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी
By nisha patil - 8/24/2023 4:52:21 PM
Share This News:
1.दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या कांद्याबाबत केंद्र सरकारचे धोरण काय जाहीर करावे
2.निर्यात शुल्क वाढी पूर्वी कंटेनरमध्ये असलेल्या कांद्याबाबत धोरण काय
केंद्र सरकारने नाफेड द्वारे चौदाशे दहा रुपये क्विंटल कांदा खरेदीची घोषणा केली. त्याद्वारे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे. हे करत असताना प्रत्यक्ष सर्वच कांदा उत्पादकांना हा भाव मिळणार नसल्याचे पुढे आले आहे .फक्त उच्च प्रतीचा कांदा खरेदी केला जात आहे. तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या कांद्याबाबत केंद्र सरकारने काय धोरण निश्चित केले आहे हे स्पष्ट करावे. उच्च प्रतीचा 25% कांदा सोडला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचा कांदा15 / 15 टक्के आणि उर्वरित चौथ्या आणि पाचव्या प्रतीचा कांदा जवळपास 45 टक्के आहे ,या कांद्याला काय भाव मिळणार हे स्पष्ट करावे .निर्यात क्षम कांद्याला 3500 पर्यंत भाव मिळू शकतो पण नाफेड फक्त 2410 रुपये दर देणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे
सध्या कंटेनर मध्ये पडून असलेला कांदा हा निर्यात शुल्क वाढीचा निर्णय होण्यापूर्वीचा आहे. त्यावर 40% निर्यात शुल्क लावले तर परदेशात असा कांदा कोण घेणार. जवळपास 400 ते 500 कंटेनर कांदा निर्यातीसाठी प्रवासात आहे. साधारण दीड हजार मेट्रिक टन कांद्याचे व्यवहार अडचणीत येणार असून केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कांदा माघारी घेतला आणि स्थानिक बाजारात आणला तर स्थानिक आणि निर्यातीसाठी पाठविण्याच्या तयारीत अशा दुहेरी कांद्याचे करायचे काय? अशा प्रकारचे कांदा संकट निर्माण होणार आहे .त्यामुळे केंद्र शासनाने आपली भूमिका जाहीर करावी. आपले धोरण जाहीर करावे .अशी मागणी बीआरएस पक्षाच्या वतीने पक्षाचे नेते श्री संजय पाटील यांनी केली आहे
बी आर एस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे मागणी
|