बातम्या
शिवसेना उबाठा गटाच्या वतीने परिवहन मंडळाचे अभिनंदन
By nisha patil - 6/6/2024 9:59:10 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी वाहनांच्या कागदपत्रात फेरफार करून शासनाचा महसूल बुडविणाचा व जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या पोलीस प्रशासन तसेच आपल्या कार्यालयाचा सर्वप्रथम मनस्वी अभिनंदन. आशा वाहनामुळे भविष्यात अपघात झाला तर एखाद्या व्यक्तीच संपूर्ण कुटूंबच उध्वस्त होऊ शकते.
आमच्या माहिती प्रमाणे कोल्हापूर मध्ये आशा स्वरूपाच्या साधारण ४० ते ५० गाडया फिरत
आहेत. या संदर्भात परिवहन कार्यालया मार्फत ड्राईव्ह घेवून गाडयाची सक्त तपासणी करावी. तसेच या
संदर्भात सहभागी असलेले कार्यालयीन अधिकारी, लिपीक तथा एजंट प्रतिनिधी या सर्वाची चौकशी
करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.
तसेच वाहन कर्ज (बोजा) नोंद करून देताना सुध्दा खुप मोठ्या प्रमाणात आफरा तफर झाली
आहे. या गोष्टी घडत असताना यामध्ये काही एजंट प्रतिनिधी, कार्यालयीन लिपीक व अधिकारी यांचाही
मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याशिवाय शक्य नाही..
महोदय, कागदामध्ये हेराफेरी, इन्शुरन्स व चुकिच्या पध्दतीने बोजा नोंद करून जनतेच्या जिविताशी
खेळणाऱ्या प्रशासनाला भविष्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचे
आंदोलन उभा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
शिवसेना उबाठा गटाच्या वतीने परिवहन मंडळाचे अभिनंदन
|