बातम्या

मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना यावर संभाजी राजे म्हणाले...

On comparing Modi with Chhatrapati Shivaji Maharaj


By nisha patil - 1/23/2024 4:40:12 PM
Share This News:



कोल्हापूर : अयोध्येत  प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा  लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यासपीठावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. त्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे. गोविंद देव गिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर  संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.  
 

 संभाजी राजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद गिरी महाराज काय म्हणालेत हे मी ऐकलं नाही. त्यामुळं यावर ठोस बोलणं उचित होणार नाही, असे  संभाजी राजे छत्रपती म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. लोकसभेसाठी माझं पाहिले प्रेम कोल्हापूरच आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले


मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना यावर संभाजी राजे म्हणाले...