बातम्या

४० व्या वाढदिवसा दिवशी तिने घेतला खाजगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय

On her 40th birthday, she decided to focus on her private life


By nisha patil - 7/27/2023 6:21:38 PM
Share This News:



सेक्रेड गेम' फेम अभिनेत्री कुब्रा सैतचा आज वाढदिवस आहे. आज कुब्रा तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. कुब्रा ही फक्त 'सेक्रेड गेम' किंवा 'द ट्रायल' या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयासाठी नाही तर आणखी अनेक दमदार चित्रपटासाठी ओळखली जाते. कुब्रानं आजवर तिच्या करिअरवर पूर्ण लक्ष दिलं होत. आता आयुष्याच्या एका नव्या टप्याला कुब्रा सुरुवात करत आहे. याच टप्यावर कुब्रानं तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. आता 40 शीत पदार्पण केल्यानंतर कुब्राचं सगळ्यात पहिलं काही काम असेल तर ती बॉयफ्रेंड शोधणं असं तिनं सांगितलं आहे. 

कुब्रा सैतनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कुब्रा म्हणाली की 'माझ्यासाठी खरा टर्निंग पॉइंट ही गेली दहा वर्षे होते जेव्हा मी 30 वर्षांचे झाले. आता या नवीन वर्षात मी स्वत: ला शांत पद्धतीनं पुढे घेऊन जाणार आहे, कारण जर आज माझ्या आयुष्यात इतकी अडचण किंवा गडबड असेल तर विचार करा गेल्या दहा वर्षांपूर्वी हे सगळं कसं असेल.'


४० व्या वाढदिवसा दिवशी तिने घेतला खाजगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय