बातम्या

वंचितच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर....

On the car of Shirdi Lok Sabha candidate Utkarsha Rupwate of Vanchit


By nisha patil - 7/5/2024 4:14:07 PM
Share This News:



वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या  समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रुपवते सुखरूप असल्याची माहिती आहे.

रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.
रात्री अकोले राजूर येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी  राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन उत्कर्षा रुपवते यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


वंचितच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर....