बातम्या

बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमास ब्लॅंकेट व ऊस तोडणी कामगारांना कपडे वाटप

On the death anniversary of Balasaheb Thackeray


By nisha patil - 11/17/2023 7:44:51 PM
Share This News:



 हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची  पुण्यतिथी राज्यभर साजरी केली जात आहे,कोल्हापूरमधील  शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उप जिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वा खालीपुण्यतिथीचे औचित्य साधून गरजूना ,पीडितांना कपडे ब्लॅंकेट चे वाटप कार्यांत आले 


शिवसेनेचे धोरण 80 टक्के समाजकार्य  आहे या पार्श्वभूमीवर  शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उप जिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे यांच्या नेतृत्वा खाली  (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) प्रतिभानगर येथे हृदय सम्राट माननीय बाळासाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिभा नगर येथे महिला शाखा येथे फोटो पूजन व उजळवाडी शाहू टोलनाक्यापाशी वृद्धाश्रम येथे ब्लॅंकेट वाटप व वडणगे येथे ऊस तोडणी कामगारांना कपडे वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला नागरीक व महिला मोठ्या संख्येने उप स्थिती होते

यासाठी आदरणीय रश्मीताई ऊद्धव ठाकरे ,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर,महिला संपर्क संघटिका श्रद्धा ताई जाधव,कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख मंगेश साळवी,जिल्हाप्रमुख संजय पवार जिल्हा संघटिका, शुभांगी ताई पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

यावेळी  शहर संघटिका शुभांगी पिसाळ, स्वरुपा खुरांदळ, सविता कानूरकर,अनिता ठोंबरे,,प्रेरणा बाचुळकर, रुपाली घोरपडे, वर्षा पाटील, अश्विनी घोडगावकर,असावरी सुतार,जयश्री माडीवाडकर,  रवी नलावडे, दिनेश परमार,रणजित आयरेकर दादा शमीत सावंत, पपू गुडले ,समीर कुलक्णी, अभिजीत जाधव, स्वप्नील रजपूत टिकू देशपांडे व महिला पदाधिकारी उपस्थित होते


बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमास ब्लॅंकेट व ऊस तोडणी कामगारांना कपडे वाटप