बातम्या

अक्षय तृतीयेच्या सणादिवशी दिलासा देणारी बातमी समोर

On the occasion of Akshaya Tritiyathere is a comforting news


By nisha patil - 10/5/2024 5:00:17 PM
Share This News:



वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी दुसरा व अर्धा मुहूर्त असलेला अक्षय  तृतीयेचा आज सण आहे. या दिवशी सोनं   खरेदीला विशेष महत्व आहे. मोठ्या प्रमाणात लोक यादिवशी सोन्या चांदीची खरेदी करत असतात. या अक्षय तृतीयेच्या सणादिवशीच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. गेल्या काही दिवसापूर्वी सोनं 76 ते 77 हजार रुपयांवर गेले होते. पण सध्या मुंबईत सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 73000 रुपये द्यावे लागत आहे. सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झालीय.
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व असतं. अशात, यंदा अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाऊन जाणार आहे. सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळं यंदा सोने खरेदीत 20 टक्के वाढीचा अंदाज आहे. आज सोन्याच्या भाव 73 हजारांवर आहे. त्यामुळं सोनं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दरात घट झाल्याचा परिणाम सोने खरेदीवर होणार आहे. खरेदी वाढण्याची शक्यता आहे.


अक्षय तृतीयेच्या सणादिवशी दिलासा देणारी बातमी समोर