बातम्या
जागतिक महिला दिनानिमित्ताने कोल्हापूरात प्रथमच महिलांचा रक्तदान करण्याचा निर्धार
By nisha patil - 7/3/2024 10:44:27 PM
Share This News:
जागतिक महिला दिनानिमित्ताने कोल्हापूरात प्रथमच महिलांचा रक्तदान करण्याचा निर्धार
"घे भरारी रक्तदानासाठी"
ही संकल्पना कोल्हापूरचे रक्तमित्र धनंजय पाडळकरांची. याची तयारी करत असताना 1 मार्चला धनंजय सरांचा आकस्मित मृत्य झाला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आणि महिला रक्तदान सोहळा यशस्वी करण्याचे मैत्र दिंडी fb समूह, ओंकार वेलफेअर फाउंडेशन आणि धनंजय मित्र परिवाराने ठरविले आहे. हीच धनंजय सरांना श्रद्धांजली असेल.
जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
पण याला अपवाद म्हणून कोल्हापूरात प्रथमच ओंकार फाउंडेशन व मैत्र दिंडी fb परिवाराकडून रक्तदान शिबिर आयोजित करून एक वेगळा पायंडा, सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने घेत आहोत. गेली अनेक वर्ष जीवनदाता संस्थेमार्फत केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचं आयोजन येणार आहे.
हा एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम केवळ महिलांसाठीच विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहोत आणि दरवर्षी असेच शिबिर घेऊन कोल्हापूर करांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवत आहोत. 'रक्तदानात महिला कुठेच दिसत नाही, नेहमीच यांचे हिमोग्लोबिन कमी असे महिलांना हिणवले जाते.' याला जशास तसे उत्तर म्हणून या रक्तदान शिबिरात केवळ महिलाच रक्तदान करतील.
या विशेष महिला रक्तदान शिबिरात येऊन महिला रक्तदान करून एका वेगळ्याच आनंदाला गवसणी घालतात. "कोण बोलतो महिला रक्तदानात मागे, हे बघा आम्ही केले रक्तदान" हे वाक्य अभिमानाने बोलणार आहेत. उत्स्फूर्तपणे व उस्ताहाने हे रक्तदान शिबीर मंडपात महिला अक्षरशः रांगा लावून रक्तदान करतील. "घे भरारी रक्तदानासाठी" या टॅग लाईनचा उदघोष करून रक्तदान करतील.
हिमोग्लोबिनची तपासणी करूनच येथे रक्त स्वीकारले जाईल. १०० मधील ५० महिला केवळ हिमोग्लोबिन कमतरतेमुळे रिजेक्ट होतात. पण पुढील वेळी हिमोग्लोबिन वाढवून 'परत रक्तदानाला येऊ' हा निर्धार करूनच त्या घरी परततील.
या वेळेच्या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना त्यांच्या हिमोग्लोबिनची लेवल त्याच क्षणी कळणार आहे.
या शिबिरात रक्तदान करण्याहेतू येणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात येईल. रक्तदान करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ५० वर्षावरील रक्तदान करणाऱ्या महिलांचा लक्षवेधी सन्मान करण्यात येईल.
यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक महिलेला फेटा, ढाल-तलवार सोबत महाराष्ट्रीयन नथ घालून आम्ही तेजस्विनी या संकल्पनेवर फोटो शूट करण्याची संधी मिळणार आहे.
पिकनिक, पार्टी व ईतर मनोरंजन न करता महिलांच्या हक्काच्या दिवसाला समाजसेवेचे रूप देता येते हे सुद्धा केवळ महिलाच सिध्द करू शकतात . चला तर आपण सर्व महिला मिळून रक्तदान🩸 क्षेत्रात विजयाची पताका🚩 फडकवण्यासाठी रक्तदानासाठी भरारी घेऊया. प्रयत्न करायला काय हरकत आहे
अशी साद ओंकार वेल्फेअर फाउंडेशन व मैत्र दिंडी एफबी,,ब्लड@24×7,, थयलिसीमिया ऑर्गनायझेशन परिवाराच्याच्या वतीने सर्व रक्तदान करू इच्छिणाऱ्या महिलांना घालण्यात आली आहे.
प्रत्येक वेळी स्त्रियांचे हिमोग्लोबिन कमी नसते हा न्यूनगंड बाजूला सारून इतर महिलांच्या सोबत या केवळ महिलांच्या उत्साहात सामील होण्यास आवर्जून या.जल्लोष करूया. महिलांची जिद्द व ताकद दाखविण्याची संधी दवडू नका.
दिनांक 10 मार्च २०२४
जागतिक महिला दिन
सकाळी 10 ते दुपारी 2
१० मार्च २०२४ रोजी,सकाळी १० ते २ वाजेपर्यंत शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ,कोल्हापूर.
*संपर्क व अधिक माहितीसाठी
अमोल सरनाईक : 9890654281
धनंजय नामजोशी
:9923167554
आभास पाटील 9869675166
जागतिक महिला दिनानिमित्ताने कोल्हापूरात प्रथमच महिलांचा रक्तदान करण्याचा निर्धार
|