बातम्या
कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी तीन कोटी रुपयांचा धनादेश भारतीय सैन्य दलाला सुपूर्द
By nisha patil - 7/26/2023 8:09:27 PM
Share This News:
कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी तीन कोटी रुपयांचा धनादेश भारतीय सैन्य दलाला सुपूर्द
कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी तीन कोटी रुपयांचा धनादेश भारतीय सैन्य दलाला सुपूर्त करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते कारगिल विजय उत्सवाला 24 वर्षे पूर्ण झाली असून या युद्धात राज्यातील 25 जवान शहीद झाले होते याच भावनेतून लडाख येथील त्रिशूल स्मारकासाठी मदत दिली असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून शौर्याला वंदन करण्याची शिकवण या मातीने आपल्याला दिलेली आहे सैन्य दलाला निधी देणे हे शासनाचे कर्तव्य असून ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत या समय व्यक्त केले याप्रसंगी लेफ्टनंट जर्नल एच एस केवलोन ब्रिगेडियर आचले शंकर लेफ्टनंट कर्नल एस के सिंह जिल्हा सैनिक वेल्फीयर बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव आणि सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड हे उपस्थित होते
कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी तीन कोटी रुपयांचा धनादेश भारतीय सैन्य दलाला सुपूर्द
|