बातम्या

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन, विविध वेशभूषा व पुस्तकांचे वाटप

On the occasion of Savitribai Phule Jayanti greetings


By nisha patil - 3/1/2024 2:12:15 PM
Share This News:



सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन, विविध वेशभूषा व पुस्तकांचे वाटप 

कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने आम्ही सावित्रीच्या लेकी या अनुषंगाने दहा विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा परिधान करून सावित्रीबाईंच्या विचाराचा जागर केला.सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित साऊ या पुस्तकांच्या 25 प्रतींचे वाटप यावेळी करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
     

महाविद्यालयातील स्त्री व्यक्तिमत्व विकास समिती आणि सखी मंच यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


   

स्वागत प्रा.सौ.शरयू शेवडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सौ. संस्कृती पाटील यांनी केले. कुमारी समीक्षा शरद माने हिने सावित्रीबाई फुले जीवन परिचयावर मनोगत व्यक्त केले. प्रा. सौ. सारिका मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सौ. सुरेखा मंडी यांनी आभार मानले. प्रा. सौ. माधवी गायकवाड यांनी संयोजन केले. 


 

 प्रतीक्षा बाजीराव पोवार यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. धनश्री मारुती मोरे यांनी डॉक्टर, सोनम बाळासो यादव यांनी आर्मीवूमन, प्रतीक्षा शहाजी हुंबे यांनी टीचर, ऋतुजा व्हरांबळे यांनी इंजिनियर,प्रणाली यादव यांनी स्पोर्ट्स वुमन, सादिया नायकवडी यानी वकील,दिशा बाजीराव मनाडे यांनी राजकारणी, जानवी मैना यांनी हवाई सुंदरी, अदा मुजावर यांनी बयुटिशियन, मानसी मगदूम यांनी बिझनेस वुमन अशा वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या.
     तसेच ऋतुजा तानाजी कुंभार, प्रतीक्षा बाबासो भोसले, तृप्ती सर्जेराव पाटील ,पल्लवी गजानन भोसले, स्वाती सुरेश बडसुळे, आकांक्षा अनिल रेपे, मोनिका शहाजी हुंबे, प्रतीक्षा प्रकाश गुरव व इतरांना साऊ या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. डॉ. आर.डी. मांडणीकर, ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील डॉ. दीपक कुमार वळवी, डॉ. के. एम. देसाई, सर्व प्राध्यापिका, प्राध्यापक,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमास संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग  बोंद्रे यांचे प्रोत्साहन लाभले.


सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन, विविध वेशभूषा व पुस्तकांचे वाटप