बातम्या
शिवजयंती व 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षा निमित्त शहाजी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
By nisha patil - 2/18/2024 11:58:04 PM
Share This News:
कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभागाद्वारे व IQAC अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा शहाजी महाविद्यालयात अतिशय उत्साही व उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेमधत शहाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह एकूण १० विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी या मध्ये सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य, समकालीन सामाजिक, आर्थिक, प्रसासकीय घटकावर या स्पर्धेत प्रश्न विचारण्यात आले. एकूण चार टप्यात व प्रत्येक टप्यात दोन फेरी असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. शानेदिवाण सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयातील प्रा. डॉ. सौ. एस. एस. पाटील व डॉ. आर. डी. मांडणीकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी उत्तमपणे पार पडली. अतिशय पारदर्शकपणे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये अनुक्रमे महावीर कॉलेज प्रथम, कमला कॉलेज द्वितीय, विवेकानंद कॉलेज तृतीत क्रमांक आले. विजेत्या कॉलेज संघांना रोख बक्षीसे व प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. शानेदिवाण सर यांच्या हस्ते देण्यात आली.
प्रा. एस. डी. अपराध यांनी प्रमुख उपस्थितीतांचे स्वागत, डॉ. एस. व्ही. शिखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन, डॉ. एस. डी. जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाळू इंगवले, विजय लाड, अतुल कांबळे, विशाल काळे व अन्य सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील 38 हून अधिक पुस्तकांचे प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयात संपन्न झाले.
]छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील पुस्तके वाचून त्यांचे विचार आत्मसात करा, त्यांच्या विचाराचा नेहमी जागर करा असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी याप्रसंगी केले.
ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. सहाय्यक ग्रंथपाल उर्मिला साळोखे, मंजिरी भोसले, अर्पणा गावडे, सुहास टिपुगडे बाळासाहेब इंगवले, दीपक गुरव, विजय लाड, अतुल कांबळे यांनी संयोजन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले . श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमांस प्रोत्साहन मिळाले.
शिवजयंती व 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षा निमित्त शहाजी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न
|