बातम्या
शिवजयंती व राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानंही मिळणार ‘आनंदाचा शिधा
By nisha patil - 10/1/2024 10:48:14 PM
Share This News:
सण-उत्सवाच्या निमित्तानं रेशनकार्ड धारकांना दिला जाणारा आनंदाचा शिधा आता आणखी दोन दिवशी मिळणार आहे.अयोध्येतील राम मंदिरात होणारा प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा व शिवजयंती या दोन उत्सवांच्या निमित्तानं राज्यातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत रेशनकार्ड धारकांना ही खूशखबर देण्यात आली.
राज्य सरकारच्या वतीनं गुढी पाडवा, गणेशोत्सव व दिवाळी अशा सणांनिमित्त रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. यात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर, एक किलो तेल, पोहा आणि मैदा याचा समावेश असतो. अवघ्या शंभर रुपयांत या जिन्नस गरजूंना दिल्या जातात. आता हा शिधा आणखी दोन दिवस दिला जाणार आहे. अर्थात, राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं मिळणारा शिधा हा प्रत्येक वर्षी मिळेल का हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
शिवजयंती व राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानंही मिळणार ‘आनंदाचा शिधा
|