बातम्या

श्रीपतराव बोंद्रे दादा पुण्यतिथी निमित्त शहाजी महाविद्यालयात प्रशासकीय सेवकांसाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न

On the occasion of Sripatrao Bondre Dadas death anniversary


By nisha patil - 9/30/2023 8:35:34 PM
Share This News:



 कोल्हापूर: महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या 23व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्रशासकीय सेवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील 80 प्रशासकीय अधिकारी व सेवक सहकारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. 
   

प्रारंभी श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून  कार्यशाळेचे उदघाटन झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. 
   

 शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.ए.एम.गुरव यांनी प्रशासकीय सेवकांची आणि अधिकाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की अतिशय आनंदाने, सकारात्मकतेने प्रशासकीय सहकार्यानी आपली भूमिका पार पाडावी. यासाठी नियोजन, व्यवस्थापन व इतर कौशल्य आत्मसात करावीत. यामध्ये संस्थेची, महाविद्यालयाची गुणवत्ता वाढीस लागते व आपणालाही समाधान मिळते. 
 

 दुसऱ्या सत्रात,महावीर महाविद्यालयातील डॉ. शिरीष शितोळे यांनी सेवकांना जीवन कौशल्य आत्मसात करा, त्यासाठी रोज व्यायाम,ध्यानधारणा, सकारात्मकता व आनंदी जीवनशैली आत्मसात  करावी असे आवाहन केले.     श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल आंबले, संस्थेचे अधिक्षक रुपेश खांडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, साई हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य श्री संजय पाटील, श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम च्या प्राचार्य सौ. जी. व्ही. मोहिते, डॉ. ए.बी.बलुगडे, डॉ.पांडुरंग पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. 
 

आय क्यू एस सी विभाग प्रमुख डॉ. आर.डी.मांडणीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के.एम.देसाई यांनी आभार मानले.व्ही. वाय. सी. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एस. कागले, श्री शाहू छत्रपती आयटीआयचे प्राचार्य एस. आर. वागरे,जवाहर नगर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय.एस.पोवार, श्री व्ही टी चौगुले, महाविद्यालयाचे प्रबंधक मनीष भोसले यांचेसह सर्व विभाग प्रमुख व प्रशासकीय सहकारी सेवक उपस्थित होते. 
 

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन व सहकार्य मिळाले .  स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त बोंद्रे दादांच्या जीवन कार्यावरील भिंती पत्रकाचे अनावरण ही मान्यवरांच्या हस्ते झाले.तसेच श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्यावरील व महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व इतरांच्या आत्मचरित्रावरील ग्रंथांचे प्रदर्शन शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने संपन्न झाले.


श्रीपतराव बोंद्रे दादा पुण्यतिथी निमित्त शहाजी महाविद्यालयात प्रशासकीय सेवकांसाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न