बातम्या
स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने रा.स्व.संघ, उत्तर कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने गुणवत्तापूर्ण पथसंचलन संपन्न
By nisha patil - 12/1/2025 11:40:19 PM
Share This News:
स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने रा.स्व.संघ, उत्तर कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने गुणवत्तापूर्ण पथसंचलन संपन्न
हिंदू धर्म, हिंदू विचार, हिंदू संस्कृतीची प्रभावी मांडणी स्वामी विवेकानंद यांनी जगभरात केली, त्यांची जयंती १२ जानेवारी या दिवशी जगभरात युवक दिन म्हणून साजरी केली जाते.
स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक गावात क्षमतावान युवक निर्माण व्हावेत असे स्वप्न पाहिले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील प्रत्येक गावात असे क्षमतावान स्वयंसेवक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात.
संघाच्या शताब्दी वर्षात स्वामीजी आणि संघाचे हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त उत्तर कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे गुणवत्तापूर्ण पथसंचलनाचे कोल्हापूर शहरातील मुख्यमार्गावरून करण्यात आले.
संघाचे स्वयंसेवक नियमितपणे समाजात जाऊन समाजासाठी पाच मुद्दे घेऊन काम करणार आहेत.
१.कुटुंब प्रबोधन
२.सामाजिक समरसता
३.पर्यावरण संरक्षण
४. आत्मबोध
५.नागरिक कर्तव्य
या पाच तत्वांचे आपल्या जीवनात पालन करण्यासाठी संघ परिवारातील स्वयंसेवक सतत कार्यरत राहणार आहेत. प्रायव्हेट हायस्कूल, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, डॉ. हेडगेवार चौक मार्गे महापालिका शिवाजी चौक, बिंदू चौक ते पुन्हा प्रायव्हेट हायस्कूल या मार्गावरून संचलन झाले.
यानंतर प्रास्ताविक, परिचय, योग व घोष प्रात्यक्षिके होऊन प्रमुख वक्ते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य श्री सुहासराव हिरेमठ यांचे याच पंचसूत्री वर आधारित व्याख्यान झाले.
याप्रसंगी जिल्हा संघचालक श्री सूर्यकिरण वाघ, शहर संघचालक श्री प्रमोद ढोले व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने रा.स्व.संघ, उत्तर कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने गुणवत्तापूर्ण पथसंचलन संपन्न
|