बातम्या

कोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला

On the occasion of Tripurari Purnima in Kolhapur


By nisha patil - 11/27/2023 5:46:02 PM
Share This News:



 पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शोचीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला.

 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लाखो पणत्यांच्या तेजाने,  पंचगंगा नदीचा घाट उजळला.  पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शो चीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या दिवाळीची या दीपोत्सवाला सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी होते. या दिवशी सर्व मंदिरे व जलाशयांच्या ठिकाणी दिवे लावले जातात. तर कोल्हापूरचा ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्गाचा ठेवा असेलल्या पंचगंगा नदीघाटावर यादिवशी पहाटे दीपोत्सव साजरा होतो.  कोल्हापूरकरांनी या दीपोत्सवाला मोठी गर्दी केली. शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे चार वाजता पंचगंगेची आरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत सुरू राहणार्‍या या दीपोत्सवात लावण्या जाणाऱ्या हजारो दिव्यांनी नदी घाट उजळून निघाल्याचे विलोभनीय दृश्य पहायला मिळाले. यादरम्यान रविवारी 26 रोजी दुपारी तीन वाजून 53 मिनिटांनी  त्रीपुरापोर्णिमेला आरंभ झाला आणि सोमवारी 27 रोजी दोन वाजून 45 मिनिटांनी पौर्णिमेची सांगता झाली त्यामुळे रविवारच्या मध्यरात्रीपासूनच पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सव ला प्रारंभ झाला. देवस्थान व मैत्री हायक्रस यांच्यावतीने रविवारी 26 रोजीच्या रात्री कात्यायनी मंत्राजवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे याचबरोबर विविध मंडळ व संस्थानाकडून राजाराम भंडारा रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळा जवळ ही दीपोत्सव साजरा करण्यात आला


कोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळला