बातम्या

श्रीपतराव बोंद्रे दादा व विजयराव बोंद्रे बापू यांच्या जयंतीनिमित्त शहाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालय निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

On the occasion of the birth anniversary of Sripatrao Bondre Dada and Vijayrao Bondre Bapu


By nisha patil - 4/12/2023 7:25:08 PM
Share This News:



 कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे आधारस्तंभ व माजी कृषिराज्यमंत्री  कै. श्रीपतराव शंकराव बोंद्रे (दादा) आणि कै.विजयराव श्रीपतराव बोंद्रे (बापू) यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण यांनी केले आहे. 
      निबंध लेखन स्पर्धेचे विषय असे. 1)कै.श्रीपतराव बोंद्रे दादा यांचे जीवन व कार्य 2) नवीन शैक्षणिक धोरण 2020 3) अस्पृश्योद्धारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 4) भारतीय संविधान 5) समाज माध्यमे आणि आजचा तरुण 6) कृत्रिम बुद्धिमत्ता :भविष्यातील आव्हाने 7) शाश्वत पर्यावरण :काळाची गरज .
विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात मार्फत   आपले निबंध दिनांक 15 डिसेंबर 2023 पर्यंत शहाजी महाविद्यालयाकडे पाठवावेत. 
   

वक्तृत्व स्पर्धेचे विषय:

1) कै.श्रीपतराव बोंद्रे दादा: व्यक्ती आणि जीवन कार्य

2) स्वातंत्र्याची 75 वर्षे

3) समाज माध्यमांचा समाज जीवनावरील परिणाम

4) नवीन शैक्षणिक धोरण 2020

5) नैतिक मूल्ये आणि आजचे शिक्षण

6) व्यसनाच्या विळख्यात तरुणाई

 7) अस्पृश्योद्धारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
या वक्तृत्व स्पर्धा शहाजी महाविद्यालयातील महर्षी वी.रा.शिंदे सभागृहात मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत. निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 2000,दीड हजार व एक हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार व दोन हजार व एक हजार रुपये रोख बक्षिसे आणि  प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत .श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व मानस सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे यांचे या  स्पर्धा आयोजनासाठी प्रोत्साहन मिळालेले आहे. 
   

स्पर्धक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ. के. एम. देसाई(8485859222) डॉ.डी. के. वळवी(9420135170) , प्रा. पी. के. पाटील (9860030507)यांच्याशी संपर्क साधावा.  
  श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होणार आहेत


श्रीपतराव बोंद्रे दादा व विजयराव बोंद्रे बापू यांच्या जयंतीनिमित्त शहाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय अंतर महाविद्यालय निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन