बातम्या
पहिल्याच दिवशी विधान परिषद सभागृहात सुरूवातीलाच विरोधी पक्ष सदस्यांनी गोधळ घातला
By nisha patil - 7/17/2023 6:25:06 PM
Share This News:
पहिल्याच दिवशी विधान परिषद सभागृहात सुरूवातीलाच विरोधी पक्ष सदस्यांनी गोधळ घातला
मनिषा कायदे, विपल्प बाजोरिया तसेच डाॅ नीलम गो-हे यांच्या विरोधात पक्ष बदलल्याने अपात्र करण्याची कारवाई करावी या मागणीचे पत्र विधान परिषद विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचे दिले.याबाबत सभागृहात विरोधी पक्षाने पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आक्षेप घेता येणार नाही असे सांगितले. मात्र यावर विरोधी पक्षाचे सदस्यांनी गोधळ केला. यावर उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सभागृहात असलेल्या गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्ष सदस्यांना सूचित केले.
त्यावेळी त्यांनी सदस्य किरण पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली होती. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. तसेच जे काही करायचं ते नियमानुसार करणे आवश्यक असल्याचे डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. आणि यासंदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर दोन्ही बाजूला बोलण्याची संधी देता येईल. अधिवेशन कालावधीत दररोज सकाळी गटप्रमुख बेठकीला आला असता आणि सांगितलं असतं तर वेळ नक्की दिली असती असे त्या म्हणाल्या.
. डॉ गोऱ्हे पुढे म्हणाल्या, त्यांच्या विरोधात काही असेल तरी ते सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे. परंतु गटनेत्याच्या मिटींगला शिवसेनेचे गट नेते आले असते तर हे सर्व सविस्तर मांडता आले असते असतं.
पहिल्याच दिवशी विधान परिषद सभागृहात सुरूवातीलाच विरोधी पक्ष सदस्यांनी गोधळ घातला
|