बातम्या
टीप्स : परीक्षेला जाताना
By nisha patil - 7/2/2024 3:04:06 PM
Share This News:
आपली स्वतःची दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने आखा आणि तिचे आचरण तितक्याच कठोरपणे करा. केवळ वेळापत्रक तयार करण्याचा उत्साह दाखवून नंतर हलगर्जीपणा करू नका. दिवसातून सहा ते आठ तास सातत्याने अभ्यास करा.अभ्यासक्रमाच्या नोट्स स्वतः तयार करा. आयत्या साहित्यावर अवलंबून राहू नका. मुळापासून सर्व काही वाचा आणि त्यातून तुमच्या पद्धतीने, तुम्हाला लक्षात राहतील अशा नोट्स तयार करा.
परीक्षेची रचना आणि अभ्यासक्रम नीटपणे समजून घ्या. त्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण वाचा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने पाहा. कोणत्या भागाला किती महत्त्व दिले जाते? याचा अंदाज घ्या.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक जण गोंधळतात. अभ्यास आणि पुढील भविष्याबद्दल काळजी वाटते. त्यातून अधिक ताण येतो. मात्र, परीक्षेचा अभ्यास करताना केवळ वर्तमानाचा विचार करून आपले काम करा.
दिवसातून एक तास कोणताही खेळ खेळा. ते शक्य नसल्यास एक तास चाला. शारीरिक मेहनतीचे काम करा.
स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडू नका. तसेच, एखाद्या प्राथमिक परीक्षेत यश मिळाले, म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीवरचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.
टीप्स : परीक्षेला जाताना
|