बातम्या

मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार

Once again sexual assault in a running local in Mumbai


By nisha patil - 6/15/2023 6:34:08 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने महिलांच्या सुरक्षा संदर्भात सर्व बाजूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.  हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  या स्थानकादरम्यान काल सकाळी 7.28 वाजता हा भीषण प्रकार घडला. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव इथली रहिवासी असून ती नवी मुंबईतील बेलापूर इथे एका परीक्षेला जात होती.  घटनेनंतर आरोपीला आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली. नवाज करीम  आरोपीचं नाव आहे. या घटनेवर विरोधकांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले... देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहखात्यावर निशाणा साधलाय. मुंबईत धावत्या लोकलमध्ये परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी  केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ?  याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी सरकारने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.


मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार