बातम्या
कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदानाचं रॅकेट उघडकीस
By nisha patil - 2/13/2025 6:25:05 PM
Share This News:
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट उघडकीस आलय. कळंबा येथील साई मंदिराजवळील श्रद्धा हॉस्पिटलवर अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व पोलिसांनी कारवाई केलीय.तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांना करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथून ताब्यात घेतलय.श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली सुभाष ताईगडे, सुप्रिया संतोष माने, आणि धनश्री अरुण भोसले अशी ताब्यात घेतलेल्या तिघींची नावे आहेत.
बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आलीय. पथकाने संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या. याबाबत खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भिकाजी देशमुख आणि करवीर तालुका आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी करवीर पोलिसांत दोन फिर्यादी दिल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांत दोन कारवाया झाल्याने जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा स्पष्ट झालय.
कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदानाचं रॅकेट उघडकीस
|