बातम्या

बनावट मालाची विक्री करताना एकजण ताब्यात

One arrested for selling fake goods


By nisha patil - 3/30/2024 8:06:59 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी नामांकीत कंपनीच्या नावाखाली १,८४,५६७ रुपये किमंतीचा बनावट हार्पिक
लिक्वीड, लायजॉल, गुडनाईट लिक्वीड विक्री करणा-या इसमास मालासह स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन  कारवाई केली. प्रक्रिया सुरु झ लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावणामध्ये पार पडावी या करीता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हेगारी मोडीत काढणे बरोबरच अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करणे बाबत सक्त सुचना देवून केले कारवाईचा आढावा घेणेचे काम सुरु आहे .. दिनांक २९/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना त्यांचे कडुन उद्यमनगर कोल्हापूर येथील "झील एन्टरप्रायजेस" या गोडावूनमध्ये बनावट हार्दिक लिक्वीड, लायजॉल, गुडनाईट लिक्वीड अशा मालाचा साठा केलेला असुन, त्यावर गोदरेज व इतर नामांकीत कंपनीचे लेबल लावुन तो विक्री करत असल्याची बातमी मिळाली.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षकसागर बाघ व त्यांचे सोबत असले पोलीस अमंलदार यांना छापा कारवाई बाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक सांगर वाघ व त्याचे पथकाने नमुद ठिकाणी गोदरेज या कंपनीकडुन नेमस्त केलेल्या श्रीमती माधुरी वर्मा यांना पाचारण करून, सदर ठिकाणी अचानक छापा टाकुन पाहणी केली असता, गोडावुन मध्ये गोदरेज कंपनीचे गुडनाईट लिक्वीड, हार्दिक, रेकीट, लायजॉल कंपनीचे बाथरूम क्लीनर, ग्लास क्लीनर, टाईल्स क्लीनर इत्यादी मालावर नामांकीत कंपनीचे लेबल लावलेले आढळुन आले. सदर मालाची माधुरी वर्मा यांनी तपासणी केली असता, तो माल बनावट असल्याचे निष्पन्न झाला.

सदरचा १,८४,५६७/- रुपयेचा माल दोन पंचा समक्ष कायदेशिर प्रक्रिया करुन जप्त केला
तसेच सदर व्यवसायाचा मालक भरत हेमंत भानुशाली वय ३५ रा. ताराबाई पार्क कोल्हापूर याला
ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द नमुद कंपनीच्या कॉपीराईट स्वामीत्वाच्या मुळ हक्काचे उल्लंघन केले बाबत
श्रीमती माधुरी वर्मा यांनी दिले तक्रारी प्रमाणे कॉपीराईट अधिनियम १९५७ चे सुधारीत अधिनियम
१९८४ चे कलम ५१,६३ प्रमाणे राजारामपूरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई ही  पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक,  जयश्री देसाई यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र
कळमकर व सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, संजय पडवळ, तुकाराम राजीगरे, विनायक चौगुले,
संतोष पाटील, युवराज पाटील, दिपक घोरपडे, संतिश जंगम, सत्यजित तानुगडे, विनोद कांबळे
गोदरेज कंपनीच्या माधुरी वर्मा यांनी केलेली आहे.


बनावट मालाची विक्री करताना एकजण ताब्यात