बातम्या

'अर्थ अवर'च्या माध्यमातून शहरात एक तास वीज बचत

One hour electricity saving in the city through Earth Hour


By nisha patil - 3/23/2024 10:19:33 PM
Share This News:



नागरिकांना विजेच्या बचतीचे महत्त्व  समजावे आणि कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, या उद्देशाने शनिवारी रात्री 'अर्थ अवर' उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली. यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे बंद ठेवून प्रतिसाद दिला.

 डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर महानगरपालिका व महावितरणने  हा उपक्रम आयोजन  केले होते. बिंदू चौक येथे नागरिकांच्या उपस्थितीत २०० विद्यार्थ्यांनी २ हजार पणत्या प्रज्वलित करून 60+ हा लोगो तयार केला. नागरिकांना अर्थ अवरचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले.
   

रात्री ७.३० ते ८.३० या वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागाने ३० हजार पथदिवे बंद केल्याने महापालिकेची  वीज बिलातही बचत झाली. याबरोबर एका तासात १३२० किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला.
 

 जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम राबविणारे कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर ठरले आहे. डी. वाय. इंजिनिअरिंगतर्फे गेल्या १४ वर्षा पासून 'अर्थ अवर'चे आयोजन केले जाते. 


डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे,अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील,एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले,तुषार अळवेकर, तसेच  एनएसएसचे विध्यार्थी संकेत घटागे, गौरव चौगले,वैष्णवी पानवळ, अथर्व गगाने ,तनिषा मदाने,अथर्व द्राक्षे,राहुल कुंभार,आदित्य पाटील,शिवम बोधले,सेजल खोत आदींनी सहभाग घेतला. 

कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, हर्षदीप घाटगे,संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटीलसो, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे ह्या उपक्रमाला सहकार्य लाभले.


'अर्थ अवर'च्या माध्यमातून शहरात एक तास वीज बचत