बातम्या

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अपघात एक ठार

One killed in accident on Kolhapur Ratnagiri highway


By nisha patil - 6/22/2023 5:19:48 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे )  कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटाजवळ ग्रीनपार्क हॅाटेल समोरील रस्त्यावर फोर व्हिलर मोटरसायकल धडकेतील अपघातात प्रशांत संभाजीभोसले (वय ३३ रा.सातवे ता.पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. नाही  फोर व्हीलर गाडीतील जखमीला सीपीआरमध्ये दाखल केले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रशांत गोकुळ दुध संघात सुपरवायझर म्हणून कामाला आहे.आज गुरूवारी सकाळी आळवे येथील दुध संस्थेतील कामकाज आटपून गावाकडे जात होते तर रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या फोरव्हिलर गाडीने ओव्हरटेक करताना मोटरसायकलला जोराची धडक दिली.त्यामुळे फोरव्हिलर गाडीने तीन पलट्या खाल्या तर मोटरसायकलवरील प्रशांत यांना फरफटत नेल्याने डोक्यास मार लागून जागीच मृत्यू झाला.त्यांचा  देण्यात आला.त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अपघात एक ठार