बातम्या

किंग खानच्या एका उत्तराने चाहत्यांची जिंकली मने

One of King Khan answers won the hearts of fans


By nisha patil - 6/15/2023 6:36:24 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम बॉलिवूडचा किंग शाहरुख मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा शाहरुख आपल्या हजरजबाबीपणासाठी देखील ओळखला जातो. शाहरुख खानच्या एका उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.शाहरुख खानने आंतरधर्मीय विवाह केला आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. गौरी खानसोबत प्रेमविवाह केल्यानंतर या जोडप्याला तीन मुलं आहेत.शाहरुख खान हा मुस्लिम धर्मीय असला तरी प्रत्येक धर्माचा आदर करतो.एकदा शाळेतील अर्जावर शाहरुखची मुलगी सुहाना हिला धर्म काय आहे, हे लिहायचं होतं. त्यावेळी तिने शाहरुखला, आपला धर्म कोणता आहे? त्यावर शाहरुखने सुंदर उत्तर दिले.
त्यावेळी सुहानाला उत्तर देताना शाहरुखने म्हटले की, आपण सर्व भारतीय आहोत. आपला कोणताही धर्म नाही आणि नसायला हवा.
डान्स रिएलिटी शो 'डान्स प्लस'मध्ये शाहरुख खानने हा किस्सा सांगितला.शोमध्ये किस्सा सांगताना उल्लेख करताना शाहरुख खानने असेही म्हटले आहे की, "माझी पत्नी गौरी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे आणि आमची मुले भारतीय आहेत.."शाहरुख खानच्या 'पठाण' बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता तो लवकरच 'जवान'मध्ये दिसणार आहे.


किंग खानच्या एका उत्तराने चाहत्यांची जिंकली मने