बातम्या
घरफोडी करणाऱ्या एकाला घेतलं ताब्यात ; आठ गुन्हे उघडकीस....
By nisha patil - 2/13/2024 7:44:16 PM
Share This News:
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राधानगरी मुरगुडसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या परराज्यातील एकाला ताब्यात घेतलंय.सुमित महादेव निकम असं त्याचं नाव असून त्याच्याकडून
सहा लाख 78 हजार 400 रुपये किमतीचे 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत.
त्याच्याकडून घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस आलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेद्र पंडित यांनी घरपोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करणारा कर्नाटकातील आरोपी मार्केट यार्ड लोणार वसाहत परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज मार्केट यार्ड लोणार वसाहत परिसरात सापळा रचून गजबरवाडी तालुका निपाणी इथे राहणाऱ्या सुमित महादेव निकम या घरपोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलय.
पोलिसांनी त्याच्याकडून सहा लाख 78 हजार 400 रुपये किमतीचे १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत.
संशयित आरोपी निकम याने मुरगुड राधानगरी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन तर कुरुंदवाड आणि आजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केल्याची कबुली पोलिसाना दिलीय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार तुकाराम राजगिरे सुरेश पाटील सागर माने आयुब गडकरी अमित मर्दाने सुप्रिया कात्रट यशवंत कुंभार संजय पडवळ संतोष पाटील आणि सहकारयांनी मिळून केलीय.
घरफोडी करणाऱ्या एकाला घेतलं ताब्यात ; आठ गुन्हे उघडकीस....
|