बातम्या

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अपघातात एकजण ठार

One person killed in an accident on Kolhapur Ratnagiri highway


By surekha - 6/22/2023 5:55:52 PM
Share This News:



कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अपघातात एकजण ठार

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर चार चाकी आणि दुचाकी च्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.पन्हाळा तालुक्यातील सातवे इथे राहणारे प्रशांत संभाजी भोसले असं मृत व्यक्तीचं नाव आहे. गोकुळ दूध संघात सुपरवायझर म्हणून प्रशांत भोसले काम करत होते. आज बारा वाजण्याच्या सुमारास ते काम आटपून  आपल्या गावाकडे जात होते .दरम्यान रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या चार चाकी ने ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रशांत भोसले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत प्रशांत भोसले यांचा जागीच  मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. चार चाकी ने धडक दिल्यानंतर चार चाकी देखील पलटी झाली .सध्या या चारचाकीतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून, सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत


One person killed in an accident on Kolhapur Ratnagiri highway